जळगांव – दि.८ (धर्म साथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहर विधानसभा निवडणूक मनसेच्या माध्यमातून लढवणारे तरुण तडफदार उमेदवार डॉ.अनुज पाटील यांना सुरक्षेच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलिस संरक्षण जिल्हा प्रशासनाने आजपासून दिले आहे.
त्यांच्या झंझावात प्रचाराने शहरात आघाडी घेतली असून संपूर्ण शहरातील विविध भागात जावून ते मतदारांच्या भेटीगाठी घेवून त्यांच्या जळगावच्या विकासा संदर्भात भावना ते जाणून घेत आहेत.निवडणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी घेण्यात येत आहेत.
डॉ.अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने काही अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील प्रचारादरम्यान त्यांची सतत देखरेख केली जाणार आहे.
पोलिस प्रशासनाच्या या जागरूक दक्षता घेणाऱ्या भूमिकेने प्रचारादरम्यान अनुचित घटना टळणार आहे व उमेदवाराला निर्भयतेने निवडणुकीचा प्रचार करता येणार आहे.आपली भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहचून कोणतीही भिती न बाळगता मांडता येणारआहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाचे याबाबत विशेष आभार मानले आहे.