Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यामनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटलांच्या प्रचाराचा झाला शुभारंभ...प्रचाराने घेतला वेग..

मनसेचे उमेदवार डॉ.अनुज पाटलांच्या प्रचाराचा झाला शुभारंभ…प्रचाराने घेतला वेग..

जळगांव –  दि.६ (प्रतिनिधी) जळगांव शहर विधान सभेच्या निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली असताना मनसे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या झंझावात प्रचाराने वेग घेतला असून आज शाहू नगरातील जागृत देवस्थान तपस्वी हनुमान मंदीरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी सौ.लीना पाटील यांचेसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,युवक युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी स्वागत..उत्स्फूर्त प्रतिसाद..

डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला सामान्य मतदार वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.ठिकठिकाणी घरोघरी त्यांचे स्वागत केले जात होते.डॉ. अनुज पाटील यांच्या स्वागताला ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले, अनेक बहिणींच्या ओवाळणीतून कौटुंबिक प्रेम दिसलं. सोबत असलेल्या प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याने लोकांच्या मनात नव्या जोमाची आणि परिवर्तनाच्या आशेची ज्योत प्रज्वलित केली.

जनतेच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वचनबध्द – डॉ.अनुज पाटील

जनतेचे हे प्रेम फक्त विश्वास नसून, तो एक संकल्प आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच जळगावच्या उज्ज्वल भविष्या साठी. प्रत्येकाने आपल्या घरातील  व मनातील प्रश्न मांडले आणि डॉ. पाटील यांनी त्या समस्या आपल्याच घरातील मानून त्यावर तोडगा काढण्याचं वचन दिले

                यांची होती उपस्थिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ऍड जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळले, उपमहा नगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहितचे राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव, यांच्यासह डॉ.अनुज पाटील यांच्या परिवारातील सदस्य महेंद्र पाटील, यशस्वी पाटील, रेखा पाटील, डॉ.जानकीराम पाटील, प्रकाश पाटील, डॉ.लीना पाटील, डॉ, के डी पाटील, डॉ.अभिजीत पाटील, डॉ.अजय सोनवणे, कुणाल पाटील, सिद्धार्थ पाटील, डॉ.मौसमी पाटील, हितेश पाटील, शरीफ खान, राहुल पाटील, सागर पाटील, प्रवेझ शाह, अर्जुन साळुंखे, उपस्थित होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या