जळगाव – दि.५ (प्रतिनिधी) :विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. आज (दि.५) दुपारच्या प्रचार सत्रात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी आपल्या प्रभाग क्रमांक १८ मधील प्रचाराचा दौऱ्याचा शुभारंभ संतोषी माता मंदिर येथे केला. त्यानंतर पुढे मास्टर कॉलनी भागात जयश्रीताई सुनील महाजन यांनी सर्व धर्मीय एकजूटता आणि जातीय सलोखा दाखवत ‘हम सब एक है’चा नारा देत परिसरातील नागरिकांची मने जिंकली.
यावेळी आपल्या एकोप्याला तडा न जाऊ देता फक्त शहराचा विकास, तरुणांना रोजगार, महिलांची सुरक्षा आणि सर्वधर्मसमभाव या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हासमोर बटण दाबून यावेळी मतदान करा, अशी आर्त साद जयश्रीताईंनी उपस्थित नागरिकांना घातली. दरम्यान परिसरातील महिलांकडून ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांशी संवाद साधत, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेत त्यांनी परिसरातील नागरिकांची मने जिंकली.
यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे किरण राजपूत, अशोक लाडवांजरी, मुकुंद सपकाळे, जयाताई तिवारी, गायत्रीताई सोनवणे, माजी नगरसेविका पार्वताबाई भिल्ल, नीताताई सांगोडे, मनीषाताई पाटील, सुनील भाऊ माळी, किरण भावसार, प्रमोद नाईक, शाम तायडे, झाकीर शेख, डॉ सईद शाह, दानीश खान, एहफास खान, रज्जाक शाह, फिरोज मुलतानी आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.