Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यास्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

स्वस्तिक भजनी मंडळ परिवारातर्फे आ. राजूमामा भोळे यांना पाठिंबा

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शनिपेठ भागातील स्वस्तिक भजन मंडळ परिवाराने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला असून त्याबाबतचे पत्र त्यांनी आ. राजूमामा भोळे यांना दिले आहे.

आपणाकडून नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रोत्साहन मिळत असल्याने, आम्ही स्वस्तिक भजन मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यातर्फे आपले आभार मानतो. तसेच मागील १० वर्षात जळगावमध्ये जे विकास कार्य आपण घडवून आणले व यापुढे पण जळगाव मतदारसंघात विकास कार्य थांबणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असे पत्रामध्ये स्वस्तिक भजनी मंडळ परिवार यांनी म्हटले आहे.

म्हणून येणारे विधानसभा निवडणूकीत भरघोस मतांनी आपणास विजय प्राप्ती व्हावी यासाठी स्वस्तिक भजन मंडळातर्फे आपणास शुभेच्छा देत आहे. या पत्राद्वारे स्वस्तिक भजन मंडळ व परिवार आपणास पाठिंबा देत आहे, असे देखील पत्रामध्ये म्हटले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या