Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात..जुने जळगाव...

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात..जुने जळगाव परिसर, शिवकॉलनी, हरिविठ्ठल नगर परिसरात रॅली.. 

जळगाव (प्रतिनिधी) : येथील विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सात वाजता ग्रामदैवत श्रीराम मंदिर येथे फुटणार आहे. तेथून जुने जळगाव परिसरात आ. भोळे यांची प्रचार रॅली निघणार आहे. 

भाजपच्या मंडल क्र. २ तथा प्रभाग क्र. ३ ते ५ या विभागात आज दि. ५ रोजी प्रचार केला जाणार आहे. राम मंदिर,जुने जळगाव येथून सुरुवात होऊन जुने जळगाव परिसरात प्रचार रॅली निघणार आहे. तर दाणाबाजार परिसरात समारोप होईल. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या मंडल क्र. ४,६ तथा प्रभाग क्र. ७, ११ या विभागात दुपारी ३ वाजता शिवकॉलनी स्टॉप येथून प्रचाराची सुरुवात होऊन आशाबाबा नगर, खंडेराव नगर मार्गे हरिविठल नगर येथील बाजारपट्टा येथे भेटी करून श्रीधर नगरात रॅलीचा समारोप होणार आहे.

प्रचार रॅलीत महायुतीमधील घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व इतर मित्रपक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही विकासकामांसाठी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रचार रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या