जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहराची सांस्कृतिक ओळख असलेल्या जुने जळगाव येथून प्रारंभ होणाऱ्या जळगाव नगरीचे ग्राम दैवत श्रीराम मंदिर संस्थानाच्या वहन उत्सवात आज दि.४ रोजी शोर्याचे व साहसाचे प्रतीक असलेल्या वाघाचे वहनाचा प्रारंभ सायंकाळी ७ वाजता रोज प्रमाणे उत्साही वातावरणात ढोल ताश्याच्या गजरात झाला.
जूने श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती श्री.मंगेश महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन आरती करण्यात आली. व नियोजित मार्गाने पान सुपारी साठी वहन मार्गस्थ झाले.या प्रसंगी जूने जळगाव ब शहरातून विविध परिसरातून आलेल्या भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती .वहन समितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.जूने जळगाव परिसरात या वहन उत्सवाच्या कालावधीत चैतन्यपूर्ण वातावरण पहावयास मिळत आहे.उद्या दि.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिंहाचे वहन निघणार आहे.रोज भाविक भक्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पूर्वीच्या दिवसात घोडा,हत्तीचे वहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
आज दि.५ रोजी चे वहन सिंहाचे..