Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यासमाजातील सर्व घटकांना विचारात घेवून माझी उमेदवारी कायम..जोरदार प्रचारातून मतदारापर्यंत पोहचणार

समाजातील सर्व घटकांना विचारात घेवून माझी उमेदवारी कायम..जोरदार प्रचारातून मतदारापर्यंत पोहचणार

जळगांव- दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगांव शहराच्या परीपूर्ण विकासाची कास धरून समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीच्या आकांक्षेला साकार करण्यासाठी मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता व तो आजही माघारी न घेता कायम आहे.अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अपक्ष उमेदवार माजी महापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने मला कपाट हे चिन्ह दिलेले आहे.
शहरातील सर्व भागात प्रचार यंत्रणा कार्यरत झाली असून युवा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.ज्येष्ठ व माता भगिनी यांचा देखील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.तळागाळापर्यंत माझ्या उमेदवारीचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते जीवापाड परिश्रम करीत असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

माझी लढाई ही कोण्या व्यक्ती,पक्ष,प्रवृत्ती विरुद्ध नसून जळगाव शहराची अविकसित शहर म्हणून झालेली ओळख पुसण्यासाठी असून त्याचे परिवर्तन राज्यातील सुंदर,प्रगतिशील असे जळगाव शहर निर्माण करण्यासाठी आहे. नकारात्मक आरोप न करता विकासासंदर्भात प्रश्न व त्या साठीच्या उपाययोजनांना
महत्त्व देणारा अजेंडा घेवून जन्तेतेसमोर जाणार आहे.
निश्चितच जळगावकर जनता माझ्या विकासाच्या हाकेला प्रतिसाद देवून विजयी करतील याची खात्री आहे.अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या