Saturday, December 21, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याखोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका..मी मैदानावर उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार

खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका..मी मैदानावर उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार

जळगांव – दि.४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)शहरता गेल्या काही दिवसांपासून विद्यमान आमदार महोदय तसेच त्यांच्ये तथाकथित कार्यकर्ते माझ्या उमेदवारी संदर्भात माघार घेणार असल्याचे सांगून अफवा पसरवत आहेत त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये.मी पक्षाने चांगले कार्य करूनही डावल्लेल्या उमेदवारांसाठी ही लढाई लढत असून उद्यापासून पूर्ण शक्तिनिशी प्रचाराला सुरुवात करत आहे.जळगांव शहराच्या खऱ्या आवश्यक उर्वरित राहिलेल्या विकासासाठी कार्य करण्याचा मानस डॉ.आश्विन सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला.

माघार घेणार आहे,आर्थिक व्यवहार होणार आहे अश्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात होत्या.पण मी हे सिद्ध केले की मी ही निवडणूक लढवून दाखवेल अश्या सर्व चुकीच्या बातम्यांचे मी पूर्णपणे खंडन करतो.मी जर सत्य समोर आणले तर तुम्ही अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही.तुम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होईल.मी पक्षातील वरिष्ठांची माफी मागून घेईल मात्र मी आपल्या निर्णयावर ठाम आहे.माझे ध्येय एकच आहे शहराचा विकास व्हायला पाहिजे,जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे.तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे.

पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून वर्षानुवर्षे रखडून ठेवले जाते त्यांच्यावर जो अन्याय होतो त्यासाठी हा माझा लढा आहे.निवडणुकीत जे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे विरुद्ध जळगावच्या विकासासाठी माझी लढाई आहे.असे त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या