Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याजळगावात आ. राजूमामांचा "मॉर्निंग वॉक" प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगावात आ. राजूमामांचा “मॉर्निंग वॉक” प्रचार, नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विविध उद्यानामध्ये शनिवारी पहाटे आ. राजूमामा भोळे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनी प्रतिसाद देऊन सकारात्मकता दर्शवली.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आ. राजूमामा भोळे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शनिवारी पहाटे शहरातील प्रसिद्ध भाऊंचे उद्यान, बहिणाबाई उद्यान आणि सागर पार्क मैदानावरील परिसरातील आलेल्या नागरिकांशी राजूमामा भोळे यांनी भेट घेऊन संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील विविध प्रश्नांविषयीच्या आ. राजूमामा भोळे यांच्याशी चर्चा केली.
जळगाव शहरातील विविध विकास कामांबाबत नागरिकांनी आ.राजूमामा भोळे यांच्याजवळ समाधान व्यक्त केले. तसेच मतदार संघातील यंदाही उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी कायम राहू अशी ग्वाही नागरिकांनी याप्रसंगी दिली. गेल्या पंचवार्षिक काळात शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला, अशी माहिती यावेळी नागरिकांनी दिली.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या