मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती,आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देऊन वार्ड क्रमांक १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील तरुण हर्षल आमोदे, सौरभ दांडगे, नरेश मराठे, मोहित मोरे, गौरव पाटील, पवन पाटील, संकेत लाड, विशाल सरोदे, आकाश मोरे, विवेक पवने, कृष्णा साबळे, यश मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाचा गमछा त्यांच्या गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.
यावेळी आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, सुनील सरोदे, विठ्ठल पाटील उपस्थित होते. प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आगामी काळात आमदार राजूमामा भोळे यांना विजयी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पक्षाच्या ध्येय धोरणांना जनतेपर्यंत नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.