Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याभूमिपुत्राने जनहितासाठी केलेल्या विकास कामांसाठी आशिर्वाद व खंबीर साथ द्या - गुलाबराव...

भूमिपुत्राने जनहितासाठी केलेल्या विकास कामांसाठी आशिर्वाद व खंबीर साथ द्या – गुलाबराव पाटलांच्या सुपूत्रांचे मतदारांना भावनिक आवाहन


धरणगाव/जळगाव दि. 30 -जळगावच्या मातीचा सुगंध अनुभवणारे आणि जनतेच्या हृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचार्थ त्यांचे दोन पुत्र व शेकडो युवकांना सोगावच्या प्रत्येक गल्लीतून ही दोन भावंडं जनतेच्या मनातल्या आशा-आकांक्षांना चेतवतात.”गुलाबराव पाटील हे केवळ आमचे वडील नाहीत,ते या मतदार संघाचे भूमिपुत्र असून त्यांनी केलेल्या विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ द्यावी अशी भावनिक साद ते घालत आहेत. विकासाच्या ध्येयाशी जोडलेली ही भावनिक साद मतदारांच्या हृदयात नवी उर्जा आणि नवीन अशा निर्माण करत असल्याचे प्रत्येक गावातून जनतेच्या मिळालेल्या दिसून येत आहे.

दोन भावंडांचा तीन दिवसात 22 गावात झंझावाती प्रचार

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विकी बाबा – पाटील या दोन भावंडांचा तीन दिवसात चांदसर,दोनगाव बु., टहाकळी,आव्हाणी,भोकणी,पथराड बु.पथराड खु., लाडली फुलपाट पाळधी बु.पाळधी खु.धार,शेरी, कवठळ, दुसखेडा,एकलग्न,पोखरी तांडा,दोनगाव खु. झुरखेडा, निमखेडा,तारखेडा सह इतर 22 गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदाराशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली.

धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट – आउट, भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या