महायुतीचे हजारो कार्यकर्त्यांची राहणार उपस्थिती
जळगाव – दि.२८ (धर्म साथी मीडिया नेटवर्क) कार्यकर्त्याच्या रुपात आमतदार संघात घवघवीत व तळागाळापर्यंत विकास पोहचवण्याचा दृष्टिकोन ठेवणारी माझी उमेदवारी असून आज दि.२८ सॉमवर रोजी सकाळी १० वाजता मी जनतेचा आशिर्वाद घेवून उमेदवारी अर्ज भरत आहे.गेल्या दहा वर्षात समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय देवून सेवाभावी कार्य सातत्याने करीत राहण्याची ही परंपरा जपण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या वेळी भारतीय जनता पक्ष,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,आर.पी.आय.पक्षाचे विविध नेते पदाधिकारी,समर्थकांची मोठी उपस्थिती राहणार आहे.सुमारे १५००० कार्यकर्ते उपस्थिती देण्याचा अंदाज समर्थकांनी व्यक्त केला आहे.
तसेच जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ,व महायुतीचे सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थिती देत आहे.
देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ,ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन,यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने अनेक विकास कामे करून जळगाव शहराच्या विकासात भर घातली आहे.व हा हाती घेतलेला विकासाचा झेंडा फडकत राहण्यासाठी ही जन सेवेची परंपरा पुढे नेण्यासाठी ते कटिबध्द असल्याचे आ.सुरेश भोळे(राजू मामा) यांनी धर्म साथी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.