Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याचिंचोली व धानवड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

चिंचोली व धानवड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा भगवा पुन्हा फडकणार – गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव दि.२७ -जळगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वयक विजय लाड आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली धानवड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेचा भगवा पुन्हा फडफडणार आहे.महायुतीचे सरकार येऊन राज्यात पुन्हा स्थैर्य आणि विकास आणणार असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे.” जुने सवंगडी आपल्यासोबत आल्याने मनस्वी आनंद असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
उबाठाचे जळगाव तालुक्याचे समन्वयक विजय लाड, युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली येथील महेश सानप, मनोज शेळके, पप्पू पालवे , योगेश वाघ, भूषण पाटील, ज्ञानेश्वर दहातोंडे, संतोष लाड, संदीप पठार, सुनील बागले, दगडू वाघ, लोटन घुगे, नामदेव सानप तर धानवड येथील नितीन पाटील अतुल पाटील या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

घर वापसी झाल्याचे समाधान

हिंदुत्वाच्या कैवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व गुलाब भाऊ हे असून आपल्या हक्काच्या घरट्यात परतल्याचे समाधान यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले विजय लाड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, शेतकी संघाचे संचालक ब्रिजलाल पाटील, सरपंच मनोज चौधरी, अतुल घुगे केतन पोळ जितेंद्र पोळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या