Monday, December 23, 2024
Google search engine
Homeजळगाव शहरमाजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज : माता भगिनी,युवा कार्यकर्त्यांची...

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज : माता भगिनी,युवा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी ..


जळगांव – माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरून दि.२५ रोजी जळगाव मतदारसंघातून निवडणूक अर्ज दाखल करुन जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

उमेदवारी अर्ज दाखल करत कुलभूषण पाटलांनी शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले, त्यांच्या समर्थकांची रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. मोठ्या रॅलीद्वारे शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत, कुलभूषण पाटलांनी शक्ती प्रदर्शन केले. समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडला.

मतदारांनी दिलेल्या संधीचे सोने केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही…..- कुलभूषण पाटील

सर्वसामान्य जनतेचा सेवक,माता भगिनिंचा,वडीलधाऱ्या व्यक्तीचा,युवक मित्रांचा आणि एक जागरूक जळगावकर नागरिकाचा उमेदवार म्हणून जळगाव शहराचे माजी उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी हा उमेदवारी अर्ज जळगावच्या जनतेच्या विकासासाठी भरला असून मतदान स्वरूपात आशीर्वाद द्यावे ही विनंती त्यांनी मतदारांना केली आहे. आपण दिलेल्या संधीचे सोने केल्या शिवाय रहाणार नाही हे मी आपणस वचन देतो असे बोलताना सांगून मतदारांना त्यांनी आश्वस्त केले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या