Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याजळगावसाठी ठाकरे गटातर्फे जयश्री महाजनांना उमेदवारी...हाती सोपवली मशाल..

जळगावसाठी ठाकरे गटातर्फे जयश्री महाजनांना उमेदवारी…हाती सोपवली मशाल..

जळगांव –  दि.२४ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) जळगाव शहरातील विधानसभा निवडणुकीच्या लक्ष लागलेल्या लढतीसाठी  आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी महापौर  सौ.जयश्री महाजन यांच्या  सारख्या महिला नेतृत्वाच्या हाती मशाल सोपवत  त्यांना ही निवडणूक लढवण्याची संधी दिल्याने आता चुरस आणखीनच वाढली आहे.हा निर्णय जाहीर होताच जळगावच्या राजकीय  वर्तुळात चर्चेने वेगळे वळण घेतले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने ही संधी महाजनांना देवून नव्या राजकीय वाटेवरून  प्रवास करण्यासाठी मार्ग दिला आहे. या पूर्वीच्या त्यांच्या वाटचालीत सातत्याने राजकीय  व सामाजिक कार्यावर त्यांनी भर देवून शहरात जनसंपर्क निर्माण केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने  कार्य कर्तुत्वावर विश्वास टाकून उमेदवारी दिल्याने  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे त्यांनी  विशेष आभार मानले आहेत.तसेच पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करून या मतदार संघातील जनहिताच्या  व गरज असलेल्या कार्यातून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईत शिवसेना  पक्ष(उबाठा गट) अधिकृत  उमेदवारी अर्ज  महानगर प्रमुख शरद तायडे यांना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे यांनी सुपूर्द केला.या प्रसंगी सुनील महजान ,संपर्क प्रमुख संजय सावंत यांची उपस्थिती होती.

 

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या