जळगांव – दि.२० (धर्मसाथी मीडिया नेटवर्क)जळगाव शहराचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना भाजपा कडून तिसऱ्यांदा आमदारकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. यासोबत यंदाच्या विधानसभेत ते तिस-या वेळेस निवडणुकीत विजयी झाले तर ते मंत्रिपदाचे दावेदार असणार आहेत.
भाजपाने आज राज्यातील एकूण ९९ उमेदवारांची निश्चितीची यादी जाहीर केली असून त्यात जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे ना.गिरीश महाजन यांना जामनेर,मंगेश चव्हाण यांना चाळीसगाव येथून,आ.संजय सावकारे यांना भुसावळ येथून तर स्व.हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे या नव्या चेहऱ्याला रावेर मधून उमेदवारीची संधी देण्यात आली आहे.
आ.सुरेश भोळे यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी आणून शासनाकडे पाठपुरावा केला.सामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यावर भर देवून केलेल्या प्रामाणिक भरीव योगदानपूर्वक कार्याची पावती पक्षाने ही उमेदवारी त्यांना पुन्हा देवून दिली असल्याचे कार्यकर्त्यात व जनतेत बोलले जात आहे.