जळगाव – दि.१८ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) ब्राह्मण सभा महिला समिती तर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने समाज भगिनींसाठी विशेष कार्यक्रम दि.२२ ऑक्टोंबर रोजी सायंकाळीआयोजित केला आहे.
ह्या वेळी धरणगाव येथील प्रा. रोहिणी अग्निहोत्री ह्यांचे “कथाकथन” आणि महिलांशी संवाद तसंच अनिताज फॅशन डिझायनींग इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ. अनिता नांदेडकर ह्या देखिल महिलांना उद्योग व्यवसायांच्या दृष्टीने विविध कोर्सबद्दल मार्गदर्शन करतील, ह्या सोबतच चंद्र गीते, उखाणे, सरप्राईझ गिफ्ट आणि भरपूर मनोरंजन आणि धम्माल अश्या मेजवानी असणार आहे.ह्याच कार्यक्रमात महालक्ष्मी आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण देखिल होणार आहे
दि. २२ ऑक्टोबर मंगळवार रोजी ५ ते ७.३०पर्यंत.या वेळेत या कार्यक्रमाचे उत्साही आयोजन समितीने केले आहे. तरी समाजातील महिलांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन ब्राह्मण सभा महिला समिती प्रमुख सौ. वैदेही नाखरे ह्यांनी केले आहे. आहे.कार्यक्रमाचे आयोजन स्थळ ब्राह्मण सभा, बळीराम पेठ. येथे होणार आहे.