जळगांव – दि.११ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष, माननीय उपमुख्यमंत्री कार्यालय मार्फत मोफत आरोग्य शिबिर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने,आमदार राजू मामा भोळे, अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर योगिता बावस्कर, व शिबिर नोडल अधिकारी डॉक्टर रितेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने ट्रान्सपोर्ट नगर मधील ड्रायव्हर, हमाल, कामगार यांची जवळजळगाव तरपास 76 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली,
यात डॉक्टर अश्विनी जेवरीकर समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक चेतन पाटील, डॉक्टर अमेय नेते, डॉक्टर ऋतुजा भोजे डॉक्टर राजश्री तायडे डॉक्टर सागर सानप, हितेश पाटील ज्ञानेश्वर राठोड यांनी ट्रान्सपोर्ट नगर मधील ड्रायव्हर मजूर वर्ग यांची तपासणी करून त्यांच्या आजच्या जीवनशैलीत कसे राहिले पाहिजे यावर मार्गदर्शन केले, व शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांबद्दल माहिती दिली,
तसेच ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून अशोक वाघ नंदू आप्पा पाटील नईम भाई मेहमान कल्पेश छेडा महेंद्र अबोटी राजाबाई भक्ता कासम भाई पटेल जावेद शेख उस्ताद मुस्ताक भाई बादली वाले कृष्णा पाटील फिरोज भाई समीर भाई या सर्वांनी डॉक्टर साहेब यांच्या आभार मानले, व आमच्या ट्रान्सपोर्ट नगर मध्ये अशाप्रकारे आरोग्य शिबिर घेण्यात यावे असे सांगितले
, आजच्या या आरोग्य शिबिर साठी आमदार राजू मामा भोळे यांनी डॉक्टरांना पाठवून सहकार्य केले त्यांच्याबद्दल जळगाव ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून अशोक वाघ यांनी आभार व्यक्त केले.