मंत्री गिरीश भाऊ महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश: समाजात जल्लोष
मुंबई – दि.१० लेवा पाटील समाज आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी मिळाल्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे, आणि यामध्ये मंत्री गिरीश भाऊ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्यामुळे हा निर्णय घडून आला आहे.
गिरीश भाऊ व गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी लेवा पाटील समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मोठं पाऊल आहे आणि विशेषत: शेती, उद्योग आणि व्यवसायातील प्रगतीला चालना देणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून लेवा पाटील समाजातील लोकांना आर्थिक मदत, विविध योजनांचा लाभ होणार आहेत.
हा निर्णय महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार असून, त्यातून या समाजाचा विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा मंत्री गिरीश भाऊ व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
लेवा समाज महासंघ व समाजाच्या विविध मंडळांनी मंत्री गिरीश भाऊ महाजन व मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले असून निर्णयाचे स्वागत केले आहे.