मांगल्य संस्थेचा धार्मिकसेवा उपक्रम
जळगाव – दि.१ येथील महाबळ परिसरातील मांगल्य सेवा संस्थेच्या वतीने श्रीनवरात्र उत्सवात देवीची आराधना,उपासना करताना उपयुक्त होईल अश्या सुंदर,आकर्षक रचनेने तयार केलेल्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठाच्या श्रीदेवीच्या उपासनेसाठी उपयुक्त स्तोत्र,आरतीसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन गोसेवेसह, रुग्णसेवेसाठी समाजात कार्यरत मांगल्य संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
भाविक भक्तांना आरतीसंग्रह
पुस्तिकेचे मोफत वितरण
समाजाच्या सेवेचे व्रत घेतलेल्या मांगल्य सेवा संस्थेच्या माध्यमातून श्रीनवरात्र उत्सवाचे निमित्ताने श्री भगवती राज राजेश्वरी देवीच्या विविध स्तोत्र,आरत्या यांचे उत्तम असे संकलन यारंगीत पुस्तिकेत केले असून त्याचे विनामूल्य वितरण श्रीदेवी भक्तांना संस्थेच्या वतीने केले जाणार आहे .सदर पुस्तिका मुद्रण व निर्मितीसाठी श्री सतीशभाऊ मदाने यांचे सौजन्य संस्थेला लाभलेले आहे
श्री.मंगेश महाराजांच्या शुभहस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन
सदर आरती व स्तोत्र संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन जुने जळगाव येथील श्रीराम मंदिराचे विद्यमान गादी पती प.पू.श्री.मंगेश महाराज जोशी यांच्या शुभ हस्ते दि.३ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी ठीक ३ वाजता जूने जळगांव येथील श्रीराम मंदिर संस्थान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. तरी या प्रसंगी आपण उपस्थिती देवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती मांगल्य सेवा संस्थेच्या वतीने श्री प्रविण कुळकर्णी यांनी संस्थेच्या कार्यकारिणीच्या वतीने केली आहे.