जळगाव – येथील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील रहिवासी रहिवासी चि.मृगांक प्रसाद निशाणदार या होतकरू विद्यार्थ्याने संगणक शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावून सातत्याने पाच निरनिराळे कॉम्प्युटर कोर्सेस यशस्वीरित्या पूर्ण करून प्रत्येक कोर्स मध्ये विशेष प्राविण्य मिळवले आहे.ह्या सुयश प्राप्तीने त्याला विशेष सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
Tally ERP, Tally Prime Professional Expert. C.C.C. certified by NIELIT (Govt. of India), Certified in Computing & Typing (30 WPM), Certified Google Blog Developer by IDTM India , यासह Business Excel या अंतिम पाचव्या कोर्स मधेही विशेष प्राविण्य ८४% मिळवत उत्तम गुण प्राप्त करीत परफॉर्मन्स कायम ठेवल्याने जळगावातील अग्रगण्य शिक्षण संस्था “थिंकिंग इन्फोटेक”चे संचालक व संचालिका तसेच ब्रह्मश्री परिवार सदस्य श्री राहुल व सौ छाया माचवे यांनी त्याचे निवासस्थानी मृगांकला प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.तसेच अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मृगांक हा ब्रह्मश्री संस्थेच्या ब्राह्मण जोड़ो अभियानाचे प्रणेते प्रसाद निशाणदार यांचा मुलगा आहे.समाजातील मान्यवरांनी त्याच्या सुयश प्राप्तीनिमित्त शुभेच्छा देवून अभिनंदन
केले आहे.