एरंडोल- येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल येथे दि.२८/०९/२०२४ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ११ दाखलपुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.७५,८३,६३५/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण २३ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.६,८६,६१८/- ची तडजोड झाली. एकंदरीत एकुण ३४ प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम ८२,७०,२५३/- रु.ची तडजोड झाली.
सदर लोकअदालतीस एरंडोल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री. ई. के. चौगले हे पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ श्री. एम. ओ. काबरे उपस्थित होते. तसेच अॅड. श्री. ए.पी.देशमुख, अध्यक्ष तालुका वकील संघ एरंडोल, अॅड. श्री. एम.बी.देशमुख सचिव तालुका वकील संघ एरंडोल, सहा. सरकारी अभियोक्ता श्री. डी.बी.वळवी, अॅड.श्री.ए.एम.काळे, अॅड. एम.एम.महाजन, अॅड.श्री.डी.डी.पाटील, अॅड. जयेश पिलोरे, अॅड. व्ही.एन. पाटील, अॅड. श्रीमती प्रतिभा पाटील व इतर विधीज्ञ तसेच श्री.आर.बी.हातागडे, श्री. एस.डी.पाटील, श्री.गणेश चौधरी, श्री.डी.एस.पाटील, श्री. एस.बी.जोशी, श्री. नितीन बेडिस्कर, श्री.आर.आर.भोई, श्री.जे.आर.वाडीले व न्यायालयीन कर्मचारी, पो.काॅ. धर्मा ठाकुर, पो.कॉ.कैलास हडप इ. उपस्थित होते.
………………………………………………..