Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनाने मंजुर केल्याने शहरात ब्रह्मश्रीतर्फे आनंदोत्सव...

ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनाने मंजुर केल्याने शहरात ब्रह्मश्रीतर्फे आनंदोत्सव साजरा


जळगाव – दि.२३ जळगांव शहरासह जिल्हाभरात ब्राह्मण हितासाठी कार्यरत ब्रह्मश्री संस्थेच्या वतीने समाजाने एकमुखी केलेल्या मागणीला शासनाने मागणीला पाठपुराव्याला शासनाने न्याय देत मंजुरी दिल्याचे वृत दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरास धडकताच ब्रह्मश्री संस्थेच्या सदस्यांमध्ये व समाज बांधवांमध्ये आनंदाचे चैतन्याचे वातावरण पसरले. सायंकाळी बळीराम पेठेत ब्रह्मश्री संस्थेच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जय परशुराम,ब्राह्मण एकतेचा विजय असोच्या घोषणांनी परिसर निनादला होता.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्मश्री संस्था जिल्हा प्रशासनासह मुंबई पर्यंत विविध आंदोलनांच्या माध्यमातून सहभाग घेत पाठपुरावा जि‌द्दीने करत होती. त्याचे फलित १० यांनी उशिरा का होईना प्राप्त झाले याचे समाधान मानत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आता. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकारी,सदस्यांचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. शासनाकडे एक हजार कोटी रूपयांच्या निधीची मागणी होती.मात्र त्यातून प्रारंभी ५० कोटी रूपयांचा निधी या आर्थिक महामंडळांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे मंजुरीचे शासन परिपत्रक दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी काढण्यात आले आहे. त्यामुळे समाजाच्या आर्थिक उत्कर्षाची बाट सुकर झाली आहे. अशी भावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

२०१४ पासून सुरू केलेल्या संघर्ष लढ्याची आठवण उपस्थित समाज बांधवांसमोर करून देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस,श्री.अजित पवार यांनी सौजन्य दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने करण्यात आला.तरोय समस्त सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

तरोच संस्थेच्या पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्यात येऊन समाज बांधवांतर्फे शुभेच्छा व आभार रॅलीचे आयोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ, सौ रेखाताई कुलकर्णी, अध्यक्ष कमलाकर फडणीस यांनी सांगितले. ब्रह्मश्री संस्थेच्या वतीने महामंडळाच्या पाठपुराव्यासाठी सक्रिय सहभाग घेत संघर्ष लढा देणाऱ्या नेतृत्वासह इतर पदाधिकाऱ्यांचा सपत्नीक सत्कार शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला.

आनंदोत्सवाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष कमलाकर फडणीस, उपाध्यक्ष डॉ. निलेश राय, मार्गदर्शक ह.भ.प.मुकुंद धर्माधिकारी,प्रसाद जोशी, अभय कुलकर्णी सर, दिपक महाजन, ताराचंद पुरोहित, प्रशांत कुलकर्णी सर, दिपक कुलकर्णी गुरूजी,अशोक कुलकर्णी,सिध्दांत फडणीस,हार्दिक वाघ, वेदांत राव तसेच ब्रह्मश्री महिला आघाडीच्या पदाधिकारी सौ.छाया वाघ, सौ.रेखाताई कुलकर्णी, सौ. मृणाल मदाने, सौ. शोभा कुलकर्णी,सौ. भाग्यश्री राव, सी. मेधा कुळकर्णी,सौ.स्वाती कुळकणी, सौ.धनश्री दप्तरी श्री.अंजली काईतवाडे, श्रीमती संजीवनी व्यवहारे, सौ.संध्या कौल, सौ. धनश्री जोशी, कु.मानसी वाघ, कु.स्मृतिका राव, मानसी जोशी यांचेसह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या