जळगाव – शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ.सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये आज रोजी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. सुकदेव थोरात यांचा स्वेच्छा निवृत्ती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
36 वर्षाची प्रदीर्घ सेवेनंतर श्री. सुकदेव थोरात यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सौ.सु.वा.अत्रे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उषा बाविस्कर यांनी देखील श्री. सुकदेव थोरात यांचा सत्कार केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे, श्री. प्रशांत साखरे, श्री. किशोर सोनवणे, सौ. किरण सैदाणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. योगेश वंजारी तर आभार श्री. सागर पाटील यांनी मानले