बळीराम पेठेतील आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे देखाव्याला भेट देण्याचे आवाहन
जळगाव – शहरातील बळीराम पेठ परिसरात भव्य अश्या धार्मिक व सामाजिक संदेश आरास उभारण्यात नावलौकिक प्राप्त अश्या आझाद क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या श्रीगणेश उत्सवात राष्ट्राला समृध्द करणाऱ्या नदीजोड प्रकल्पाचा भव्य देखावा उभारून समाजाला या ज्वलंत विषयाचे महत्त्व पटवून हा राष्ट्रीय संदेश पोहचवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावला आहे.हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना देखाव्याला भेट देण्याबाबत आवाहन
आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, बळीरामपेठ मधील सर्व पदाधिकारी,सदस्यांच्या वतीने जळगावमधील समस्त सुज्ञ नागरिक, पालक तथा सर्व शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देखाव्याला भेट देण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
यंदा मंडळाच्या वतीने देशाला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या ‘नदीजोड प्रकल्पाचा’ देखावा साकार करण्यात येवून त्या द्वारे समाजापर्यंत या विषयाची माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
देखावा बघून या विषयाचे ज्ञान वृद्धिंगत होणार आहे. मुलांच्या ज्ञानात भर पडेल.आपल्या मुलांना देशातील नद्या आणि त्यांची स्थाने यांचे ज्ञान वाढण्यास मदत होईल.नदीजोड प्रकल्पाचे उद्दिष्टे समजण्यास मदत होईल
पाण्याचे मूल्य लक्षात येईल. पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचेल.या प्रकल्पाच्या साह्याने महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले जाईल. यासाठी समस्त जळगावकरांनी आपल्या मुलांना घेऊन हा देखावा बघण्यासाठी आवश्य यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.ही भव्य आरास बळीराम पेठेतील श्री दुर्गादेवी मंदिराजवळ उभारण्यात आली आहे.मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या राष्ट्रीय उपक्रमाला तळागाळात पोहचावा यासाठी परिश्रम घेत आहे.