जळगाव – वयाच्या २१ व्या वर्षी नोकरी, मानसन्मान, पैसा सोडून सामाजिक कार्यात वेगळा ठसा उमटविणाऱ्या गुंजन गोळे यांच्या समवेत अद्वितीय गुंजन एक संवाद या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिट यांच्या सहकार्याने मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे गुरुवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुंजन गोळे या जळगावकरांसमवेत संवाद साधणार आहेत.
अमरावतीच्या वुमन्स फाउंडेशन व गोकुळ आश्रम ट्रस्टच्या गुंजन गोळे संस्थापिका अध्यक्ष आहेत. अनाथ, गरीब, एचआयव्हीग्रस्त, मनोरुग्ण, कुमारी माता आणि निराधार, गरजू महिलांसाठी त्या कार्य करतात. नवजात बालकांसाठी दूधदान चळवळ, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार देखील त्यांची संस्था करते. गुंजन या मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व बचत गटातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवीत आहे.
हिरकणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंजन गोळे यांना द रियल हिरो, सखी सन्मान, भीमरत्न, समाजभूषण, प्राऊड ऑफ महाराष्ट्रीयन, कर्मवीर, नारी सन्मान, तर्पण व जिजाऊ अवॉर्ड यासह अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले आहे.
जळगावकरांसमवेत गुंजन गोळे प्रथमच संवाद साधणार आहेत. हा प्रेरणादायी कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन रोटरी वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष
दिनेश थोरात, रोटरी एलिटचे अध्यक्ष ओमप्रकाश सिंग यांनी केले आहे.
रोटरीतर्फे जळगावात गुरुवारी अद्वितीय गुंजन – एक संवाद प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन
अधिक वाचलेल्या बातम्या