जळगाव:- जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १३ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन ८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले यातून पहिले दोन मुली व दोन मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली.
स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न झाल्या असून जिल्ह्यातील एकूण ५५ खेळाडूंनी सहभाग घेतला.पुणे येथे दिनांक २० ते २२सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघासाठी या खेळाडूंची निवड करण्यात आली.
मुलेत- सीन तडवी, आरुष सरोदे,मुली -ऋतुजा बालपांडे पाचोरा, आराध्या आमले, जळगाव तसेच इतर विजेत्या खेळाडूंना उत्तेजनार्थ म्हणून मेडल देऊन गौरवण्यात आले.
तिसरा क्रमांक गौरव बोरसे, चौथा धैर्य गोला, पाचवा ओम काळे, सहावा सोहम चौधरी, सातवा तिलक सरोदे, आठवा राज भुवा,मुली- उत्तेजनार्थ अरिबा चौधरी, झुनेरा शेख,७ वर्ष वयोगट उत्तेजनार्थ वीर अहुजा, कबीर श्रीकांत दळवी९ वर्ष वयोगट उत्तेजनार्थ द्रोणा जांबले स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे,परेश देशपांडे, संजय पाटील,आकाश धनगर यांनी पंच म्हणून काम केले.
पारितोषिक वितरण – महिला व बालविकास अधिकारी रफिक तडवी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे,जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव संजय पाटील, प्रवीण ठाकरे,परेश देशपांडे यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूना बक्षिसे देण्यात आली.
सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकारी यांनी केले..