सामाजिक व रक्तदान,आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे कौतुक…..
जळगाव- जळगाव रेल्वे स्टेशन येथे सेंट्रल रेल्वे मजूर संघ आयोजित सामाजिक सेवाभावी संस्था उपहार व मुक्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ऑर्चिड सुपरमल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व आर एल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल सह, रेडप्लस रक्तपेढीच्या सहकार्याने भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेल्वे अधिकारी,कर्मचारी, प्रवासी यांनी स्वयंस्फूर्त आरोग्य व रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजक सीआरएमएसचे गणेश कुमार सिंग यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी विशेष मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास मोलाचा सहभाग देणारे आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता सदैव सेवा कार्याला समर्पित असलेले विक्रमविर दिव्यांग रक्तदाते मुकुंद गोसावी यांचा याप्रसंगी युनियनचे राज्याचे प्रमुख समाधीयाजी यांच्यासह मान्यवरांच्या खास उपस्थित गौरव करण्यात आला
.