जळगाव – शिवसेना जिल्हाप्रमुख , माजी महापौर श्री विष्णू भंगाळे यांच्या जिल्हा पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार ,शिवसेना नेते श्री .संजय राऊत यांच्या शुभहस्ते दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे
याप्रसंगी प्रमुख पाहुणे.श्री. संजय सावंत शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख जळगाव,डॉ.ए.जी. भंगाळे मा.जिल्हाध्यक्ष काँग्रेस व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सुविधांनी परिपूर्ण अश्या नूतन कर्यालाया मुळे संबधीत व्यक्तींना व कार्यकर्त्यांना अधिक वेगवान सेवेचा लाभ होणार आहे.
तरी या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ,नागरीक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री.विष्णू भंगाळे यांनी केले आहे.