Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधून केली उपोषण सोडण्याची विनंती.. लवकरच मागणीची...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधून केली उपोषण सोडण्याची विनंती.. लवकरच मागणीची पूर्तता करण्याचे दिले आश्वासन

जालना – येथे ब्राह्मण समाजाच्या उन्नती साठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे देत त्यावर त्वरित निर्णय होण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या संघर्ष समितीचे योद्धे समन्वयक दिपक रणनवरे यांचेशी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी  संपर्क साधून त्यांना उपोषण सोडण्याबाबत विनंती केली आहे.लवकरच संघर्ष समितीने केलेल्या प्रमुख  मागणीची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिल्याने दि.२२ऑगस्ट रोजी सदर उपोषण सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने स्वतंत्र असे भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या प्रमुख मागणी सह इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता होण्यासाठी दि १५ ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेले जालन्यातील गांधी चौकात सुरू असलेले हे उपोषण २२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सोडण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक प्रयत्न सुरू झाले असून बुधवारी रात्री ११ वाजता प्रशासनाच्या प्रतिनिधी म्हणून तहसीलदार छाया पवार यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देवून आंदोलक तसेच संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक श्री दिपक रणनवरे तसेच संघर्ष समितीचे समन्वयक यांच्याशी चर्चा केली.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सूचने नुसार जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशाने आश्वासन पत्र घेऊन त्या आल्या होत्या.मात्र मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी पत्रात काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले.

या पत्रात मुंबई येथे ३ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे आयोजित बैठकीसाठी संघर्ष समिती तथा सर्व मुख्य समन्वयक यांनी बैठकीस उपस्थित राहावे असा उल्लेख आला नाही. ह्यावर रणनवरे यांनी आक्षेप घेत सदर बैठकीसाठी समितीच्या शिष्टमंडळाला उपस्थीत राहण्याचा स्पष्ट शब्दात उल्लेख करून नव्याने पत्र जारी करावे अशी विनंती श्री.दीपक रणनवरे यांनी तहसीलदार छाया पवार यांना केली.त्यावर तहसीलदार पवार यांनी सदर मुद्द्यांवर मा.जिल्हाधिकारी यांना विनंती करून नव्याने पत्र देण्याचे आश्वासन दिले आहे.

सर्व समाज बांधवांनी समाज हिताचा महत्वाचा निर्णय घ्यावयाचा असल्याने सर्वांनी आवर्जून यावे तसेच दि २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता उपोषणस्थळी गांधी चमन जालना येथे जास्तीतजास्त संख्येने उपस्थीत रहाण्यासाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या