जळगाव – शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे हिंदू व राष्ट्र हितासाठी प्रभावी कार्य करणारे देशात प्रसिध्द “जनहित याचिका पुरुष’म्हणून ओळखले जाणारे प्रभावी वक्ते ॲड.अश्विनीकुमार उपाध्याय यांचे “एक देश एक विधान’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन दि.२४ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ६ बाजता करण्यात आले आहे.
वरील प्रभावी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.हा कार्यक्रम वेळेत सुरू होणार असल्याने १५ मिनिटे अगोदर पोहचून आपले स्थान ग्रहण करावे अशी विनंती आयोजन समिती द्वारे करण्यात आले आहे.तरी सर्व धर्म व राष्ट्र प्रेमी व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थिती देवून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.