Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याबळीराम पेठेत श्री साई सेवा मंडळातर्फे तर्फे श्री महादेव पिंड व...

बळीराम पेठेत श्री साई सेवा मंडळातर्फे तर्फे श्री महादेव पिंड व नंदी स्थापना समारंभ सोहळा


जळगाव – शहरातील बळीराम पेठेतील श्रीसाई सेवा मंडळ संचलित साईबाबा मंदिरात श्रीमहादेव पिंड,नांदी स्थापना समारंभ सोहळ्यात पूजा विधी रविवार दि.१८ऑगस्ट रोजी सुरू होणार असून दि.१९ ऑगस्ट सोमवार रोजी उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात शुभ मुहूर्तावर स्थपना केली जाणार आहे.

श्री महादेवाचे स्थान आपल्या जागृत मंदिरात असावे असा मानस परिसरातील रहिवासी,आजीव सभासद, भाविक भक्तांनी, पुरोहितांनी,तसेच विश्वस्थांनी व्यक्त केला होता.त्या मुळे शिवभक्तांना या नव्या श्री महादेव मंदिराचा मोठा लाभ होणार आहे.

सगळ्यांच्या अथक परिश्रमांतून हे शिव मंदिर स्थापन करण्याचे धार्मिक कार्य साध्य होत आहे.दि.१८ऑगस्ट रोजी दुपारी २ ते सायं.८ पर्यंत पुजाविधी संपन्न होत असून,दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी ६.१५ या शुभ मुहुर्तावर स्थापनेचा शास्त्रोक्त विधी करण्यात येणार आहे..याप्रसंगी महादेव मंदिर निर्माण कार्यात मोलाचा हातभार लावणारे शिवभक्त विजय चौरसिया हे सपत्नीक या स्थापना विधीत सहभागी होणार आहे.

तरी परिसरातील व शहरातील सर्व रहिवासी शिवभक्तांनी,श्री साई भक्तांनी या श्री महादेव मंदिर स्थापना विधी समारंभ सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे विश्वस्थ श्री आशिष जोग, वीरेंद्र मोदे,हेमंत लढे,संतोष दप्तरी यांनी श्री साई सेवा मंडळाच्या वतीने केले आहे.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या