जळगाव – श्री नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळा तर्फे सालबादा प्रमाणे यंदाच्या वर्षाच्या श्री गणेश उत्सवासाठी जळगांवचा राजाचा पाटपूजन सोहळा दि ११-८-२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहें.
प्रत्येक वर्षी वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक स्वरूपातील भव्य आरास उभारणी मंडळातर्फे करण्यात येत असते.धार्मिक व सामाजिक विषयांची उत्तम मांडणी करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो.
शहरातील सर्व नागरीक व भक्त मंडळी यांना या प्रसंगी उपस्थित राहण्या साठी मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. मंडळचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
संध्याकाळी ०५ वा.पासून महापालिका इमारत जवळ,भगवा चौक जळगाव येथे कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ होणार आहे.या प्रसंगी अनेक मान्यवरांना मंडळातर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.