Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यासौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये क्रांती दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा

सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये क्रांती दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा

जळगांव – शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल मध्ये पालक शिक्षक, संघा तर्फे क्रांती दिनानिमित वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या समन्वयिका सौ लताताई छापेकर या उपस्थित होत्या.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा साळुंखे, पा. शि. संघ सदस्य सौ. सारिका शिंपी, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत इ. १ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी क्रांतीकारक व थोर समाजसुधारक यांच्या वेशभूषा व घोषवाक्य सादर केले.. स्पर्धेचे परिक्षण सौ. विद्या साखरे, सौ. शितल वारुळकर सौ. किरण सैंदाणे, श्री. प्रशांत साखरे, श्री. दिलीप बारी श्रीमती नयना बेडवाल, सौ. सुनिता चौधरी, सौ मोहिनी भदाणे यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती प्रमुख श्री. जितेंद्र वानखेडे, पा.शि. संघाचे चिटणीस श्री: अजय भिरुड यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन श्री, सागर पाटील तर आभार श्री. योगेश वंजारी यांनी मानले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या