जळगाव – शहरातील विसनजी नगर कडून शिवतीर्थ कडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर पावसाळ्याच्या दिवसात प्रचंड प्रमाणात पाणी साचून दुकानात ग्राहकांना प्रवेश मिळणे मुश्कील होवून दुकानात पाणी शिरणे ,त्यातून होणारे आर्थिक नुकसान, मानसिक त्रास तणाव, पसरणारी रोगराई अश्या विविध समस्यांचे निवेदन या परिसरातील दुकानदार व्यापारी बांधवांनी आज दी.7 रोजी मनपा आयुक्तांना त्यांच्या कार्यालयात जावून दिले.
मागील अनेक वर्षापासून या समस्येकडे होत असलेले मनपा प्रशासन विभागाचे दुर्लक्ष तसेच प्रत्येक वेळी भेटून लेखी अर्ज देवून पाठपुरावा करून देखील ह्या समस्या सुटत नसल्याने आयुक्तांना ही विनंती करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
गोलाणी मार्केट स्थित श्री हनुमान मंदिरा समोरील पूर्व बाजूला इकडची गटार जोडून ही समस्या दूर होवू शकते त्यासाठी रस्ता खोदून तेथून पाइप टाकला जावा तसेच ह्या गटारी साफसफाई होण्यासाठी लक्ष घालावे या संदर्भात विशेष सूचना आपण विभागाला द्याव्या
अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त केली आहे.
Ifbशोरुम,महेंद्र ट्रेडिंग,राधेय ट्रेडिंग,नौटी लूक्स,सॅमसंग शोरुम,निसरा मेडिकल,दुकानासमोर प्रचंड प्रमाणात पाणी साचणे व त्याचा 4 तास निचरा न होणे, पाटील फर्निचर, प्रेमराज फर्निचर या जुन्या काळापासून अस्तिवात असलेल्या दुकानात प्रत्येक पावसाच्या वेळी पाणी आत शिरत असल्याने तसेच हा रस्ता 24तास वर्दळीचा असल्याने साचलेल्या पाण्यातून वाहने चालवणे नागरिकांना,विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याने अपघात घडतात. या संपूर्ण मार्गावर प्रत्यक्ष पावसात भेट देवून ह्या समस्या सोडवण्यासाठी मनपा प्रशासन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी व खात्री करून घेत या समस्त दुकानदार बांधवांचे होत असलेले हाल थांबवावे तसेच या असह्य होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे असे विनंतीपुर्वक आवाहन या परिसरातील व्यावसायीक बांधवांनी या निवेदनाद्वारे केले आहे.या प्रसंगी महेंद्र ट्रेडिंगचे संचालक प्रदीप वेद,पाटील फर्निचरचे संचालक विजय पाटील,निसरा मेडिकलचे संदीप पाटील, प्रेमराज दिलीप चौधरी,नौटीलूक्सचे विशाल वेद, आयएफबी शोरुमचे प्रशांत वेद, सॅमसंग शोरूमचे कल्पेश वेद, राधेय ट्रेडिंगचे हंसराज वेद,लोकप्रिय रेस्टॉरंटचे सुभाष खडके,दत्ता पाटील,अल्ताफ शेख, रहीम पिंजारी,यांचेसह इतर व्यावसायिकांची उपस्थिती होती.