Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्या15 वर्षे झालेल्या ऑटोरिक्षाला मिळणार नाही योग्यता प्रमाणपत्र

15 वर्षे झालेल्या ऑटोरिक्षाला मिळणार नाही योग्यता प्रमाणपत्र

ऑटोरिक्षा  वाहनाची वयोमर्यादा निश्चित

जळगाव -दि. 6 –जळगाव जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा वाहन धारक यांना आवाहन करण्यात येते की, ज्या परवाना ऑटोरिक्षांचे वय वर्ष 15 म्हणजे ज्या ऑटोरिक्षांना 1 ऑगस्ट, 2024 रोजी 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत. अशा ऑटोरिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र करता येणार नाही ज्या ऑटोरिक्षांना 1 ऑगस्ट, 2024 रोजी वर्ष 15 पूर्ण झालेले आहेत. अशा ऑटोरिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यात येवू नये असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलेला आहे.

            तसेच मा. अध्यक्ष प्रादेशिक परिवहन प्राधिकरण जळगाव यांची 14 ऑक्टोबर, 2020 रोजी बैठक पार पडली सदर बैठकीत झालेल्या ठराव क्रमांक 11/2020 अन्वये ज्या ऑटोरिक्षांना 1 ऑगस्ट, 2024 रोजी वर्ष 15 पूर्ण झालेले आहेत. अशा ऑटोरिक्षांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करण्यात येवू नये, या बाबत सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी नोंद घेण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का) जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

 

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या