जळगाव दि. 3 – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये, मंत्री चंद्रकांत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 4 ऑगस्ट, 2024 रोजी रात्री 11.20 वा. अमरावती एक्सप्रेसने जळगाव जंक्शन येथे आगमन व वाहनाने पसाय बंगल्याकडे प्रयाण, रात्री 11.30 वा. पसाय बंगला एम.जे. कॉलेज, अनंत गणेश मंदीरासमोर, जळगाव येथे आगमन व मुक्काम,
सोमवार, दि.5 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता पसाय बंगला, जळगाव येथून वाहनाने धरणगावकडे प्रयाण, सकाळी 8.45 वाजता श्री. बाळासाहेब चौधरी यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ :- डॉ. हेडगेवार नगर एरंडोल रस्ता, धरणगाव जि. जळगाव सकाळी 9.00 वाजता धरणगाव येथून वाहनाने अमळनेरकडे प्रयाण, सकाळी 9.30 वाजता आगमन व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत विद्यापीठाचे अमळनेर, उपकेंद्र इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : अमळनेर- धरणगाव रोड, अमळनेर जि. जळगाव.
सकाळी 10.30 वाजता आगमन व प्रताप महाविद्यालयातील सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ : अमळनेर जि. जळगाव,सकाळी 11.30 वाजता आगमन व लोकमान्य शिक्षण मंडळ, अमळनेर या सस्थेच्या संगणक कक्षाचे उदघाटनास उपस्थिती, स्थळ : अमळनेर, दुपारी 1.00 वाजता अमळनेर येथून वाहनाने नाशिककडे प्रयाण.