Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्या'दिशा ' समितीत 27 विभागांचा घेतला आढावा पी .एम. किसान कार्ड, रेल्वेचे...

‘दिशा ‘ समितीत 27 विभागांचा घेतला आढावा पी .एम. किसान कार्ड, रेल्वेचे प्रलंबित प्रकल्प तात्काळ मिशन मोडवर पूर्ण करावेत – केंद्रीय क्रीडा व युवककल्याण मंत्री रक्षाताई खडसे

जळगाव दि 3 जिल्ह्यात पी.एम किसान कार्डचे ४लाख 33,055 एवढे लाभार्थी असून उर्वरितकार्ड देण्यात ज्यातांत्रिक अडचणी आहेत त्या पूर्ण करावी जिल्ह्यात रेल्वेकडून अनेक कामे पूर्ण असून ती मिशन मोडवर पूर्ण करावीत असे निर्देश देऊन जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या ज्या योजनांची कामे प्रलंबित आहेत.त्याची यादीआपल्याला द्यावी त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचे केंद्रीय क्रीडा व युवककल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित ‘दिशा'(जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) च्याबैठकित त्या बोलत होत्या यावेळी खा.स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे,आ.संजय सावकारे,जिल्हाधि कारी आयुष प्रसाद,जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित,महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालकआर.एस.लोखंडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

रेल्वे विभागाकडून अमृतभारतस्टेशन योजना सुरु असून यातरावेर,सावदा मलकापूर,चाळीसगाव,पाचोरा,जळगाव स्टेशनमध्ये विविध कामे सुरुआहेत,ते गुणवत्ता पूर्ण व्हावीत या साठी संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी दक्षता घ्यावी तसेच जिथे रेल्वे लाईनच्या खालूनरस्ते आहेत त्याचीउंची वाढविण्यासाठी तसेच जे रेल्वे लाईनवरूनचे ब्रिज आहेत तेही पूर्ण करावेत. जिथे काहीअडचणी असतील ते सांगाव्यात त्याचा पाठपुरावा करून प्रश्न सोडविलाजाईल.हे प्रश्नलोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधितआहेत. त्या मुळेयावर तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी दिले.

जळगाव विमानतळावरून सध्या मुंबई,पुणे,हैद्राबाद आणि गोवा येथे विमान सेवा सुरु असून आता पर्यंत 18, 865 एवढ्या प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.या सेवेला उत्तम प्रतिसाद असूनयाच्या वेळेत बदल केला तर अजून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अहमदाबाद आणि बेंगलोरसाठी नवीन विमानसेवा सुरु करण्याचे प्रस्तावित असून यासाठीपाठपुरावा करणार असल्याची माहिती ही केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी यावेळी दिली.

जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा संदर्भात बऱ्याच गोष्टी प्रलंबित असल्याबाबत खा.स्मिताताई वाघ,आ.सुरेश भोळे,आ.संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केले.याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून तात्काळ यातून मार्ग काढूअशी ग्वाही देऊन जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प, अटल भूजल योजना ,एकात्मिक वीज वितरण क्षेत्र योजना,दीपनगर येथील नवा प्रकल्प याचा आढावा घेवून शेतकऱ्यांना सोलार वरून मुबलक वीज मिळावी म्हणून सुरु केले.प्रधानमंत्री कुसुम योजनेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद असून का माचा वेग वाढविण्याच्या सूचना श्रीमती खडसे यांनीया वेळी दिल्या.

बी .एस. एन. एल च्या टॉवर अपग्रेड करण्याचे काम सुरु असले तरी लोकांना गुणवत्ता पूर्णसेवा मिळते आहे काया बाबतची खात्री करावी , तांत्रिक अडचणी असतील तर वरिष्ठ स्तरापर्यंत सांगाव्यात आणि लोकांना उत्तम सेवा उपलब्ध करून द्यावी . पिक विम्याच्या संदर्भात फेरतपासणी करून शेतकऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा अशा सूचना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केल्या .

या वेळी खा .स्मिताताई वाघ, आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे यांनी विविध प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. अधिकाऱ्यांनी यात प्रामुख्याने लक्ष घालून सोडवावेत याबाबत आपण वेळोवेळीआढावा घेणार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 27 विभागाच्या कामाचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेले प्रलंबित कामे याची सविस्तर माहिती दिली.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या