Monday, December 23, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याजैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई, जळगाव दि. ३१. देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला.

“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत.

ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमिवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

अधिक वाचलेल्या बातम्या

ताज्या बातम्या