जळगांव – शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.सौ.सु.का.अत्रे प्राथमिक विद्या मंदिरात वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, चिटणीस अभिजीत देशपांडे तसेच ॲड.पंकज अत्रे, श्री शरदचंद्र छापेकर,सचिन दुनाखे,पारसमल कांकरिया व शि.प्र. मंडळ संचलित सर्व शाळांच्या समन्वयीका सौ.पद्मजा अत्रे,रजनी पाठक,सौ.प्रिया देशपांडे,तसेच सर्व शाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.
याप्रसंगी वृक्षारोपण देखील करण्यात आले. सौ सुवर्णा देशमुख यांनी शाळेसाठी खेळणी व ग्रंथालयासाठी पुस्तके कल्पना सोनवणे यांनी दिले.याप्रसंगी सरस्वतीपूजन व्यासपूजन दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच वार्षिक बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वितरण करण्यात आले.
बालवर्गाच्या बालचमूसह मान्यवरांनी केक कापला. शि.प्र.मंडळाचे माजी कार्यअध्यक्ष ॲड.अच्युतराव अत्रे यांच्या जयंती निमित्त पाऊस गाणी व माझा आवडता ऋतू या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या.
विज्येत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा बाविस्कर यांनी केले.सूत्रसंचालन रुपाली जोशी
यांनी तर आभारप्रदर्शन कल्पना सोनवणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शालेय कर्मचारी यांनी केले.