जळगांव – जळगांव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी जळगाव येथून आषाढी यात्रेकरीता प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही पंढरपूर येथे आषाढ शु. दशमीला म्हणजे दि. 16 जुलै या शुभ दिनी आगमन झाले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता पंढरपूर जवळील चिंचोली गावी विश्वगुरू श्रीसंत निवृत्तीनाथ व श्रीसंत मुक्ताबाई या भाऊबहीण तथा गुरू शिष्य असलेल्या संतांचा भावपूर्ण भेट दर्शन सोळा संपन्न झाला.
श्रीसंत निवृत्तीनाथ यांचे वंश परंपरागत पुजारी सेवेकरी व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री.जयंत महाराज गोसावी, व पालखी सोहळा प्रमुख व सुप्रसिद्ध कीर्तनकार बेलापूरकर महाराज फडाचे प्रमुख ह.भ.प. श्री. मोहन महाराज बेलापूरकर महाराज श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. श्री. मंगेश महाराज यांनी परस्परांचा श्रीफळ प्रसाद देवून सत्कार केला.
चिंचोलीचे सरपंच व ग्रामस्थ मंडळीनी श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. श्री मंगेश महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला मंगेश महाराजांनी चिंचोलीचे सरपंच व ग्रामस्थ मंडळी यांचा श्री संत मुक्ताईंचा प्रसाद दिला दुपारी ४ वाजता वाखरी येथील समस्त संतांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर पाऊल विविध पंढरीपर / संतपर अभंग पालखी नाथ चौकात आली तेथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत एकनाथ महाराज पादुका मंदिर असल्याने धन्य धन्य निवृत्तीराया , ज्ञानीयांचा राजा गुरू महाराव व शरण एकनाथा l पायी माथा ठेविला l हे अभंग कपूर आरती करून पुढे पालखी श्री संत सोपानकाका महाराज सासवड यांचे मठा समोर श्रीसंत सोपान महाराज मठा समोर सोपानदेवांचा अभंग होऊन पालखी महाद्वार समोर आली वारकरी मंडळींनी महाद्वार बघितल्यावर भावविभोर झाले व एकाच वेली सर्वांनी श्री विठोबाचा नामघोष केला योगीया दुर्लभ तो म्या देखीला रात्री साजणी l हा अभंग आरती होऊन नामदेव जनाबाई भजन पालखी नामदेव मंदिर येथे नामदेव नामदेव हा अभंग व आरती होऊन पालखी चंद्रभागेच्या वाळवंटात गेली तेथे श्री संत मुक्ताईंच्या पादुकांना चंद्रभागा स्नान करून अवघेची तीर्थे घडली एकवेळा l चंद्रभागा डोळा देखलिया हा अभंग म्हणून मुक्ताबाई मुक्ताबाई नामघोष करीत पालखी संध्याकाळी 6.30 वाजता जळगावकर महाराजांच्या वाड्यात श्री संत मुक्ताबाई पालखीचे शुभागमन झाले. पूर्ण पूर्ण केला l पूर्ण केला मनोरथ l हा अभंग होऊन आरती करण्यात आली दशमीचे ह.भ.प. श्री सखाराम महाराज कजगावकर यांचे कीर्तन झाले
एकादशीस नगरप्रदक्षिणा, चंद्रभागेत मुक्ताबाई पादुकांना महास्नान झाले. गुरुपौर्णिमेपर्यंतच्या मुक्कामात रोज पहाटे ५ ते ७ काकड भजन, काकड आरती, महापुजा व मंगलारती, सकाळी भजन , दुपारी १२ वाजता महानैवेद्य, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता ह भ प श्री अशोक महाराज पांडव (प्रवरासंगम), यांची प्रवचने , सायंकाळी ५ वाजता सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी ६. ३० वाजता धुपारती, सायंकाळी ७ वाजता कीर्तन, रात्री १० वाजता हरिजागर तसेच आषाढ शु. १४ ला परंपरेप्रमाणे पहाटे ४ वाजता श्री सद्गुरु अमळनेरकर महराजांनी समस्त भक्तमंडळीसह श्री संत मुक्ताबाई पादुकांचे दर्शन घेतले. तसेच श्रीसंत भानुदास महाराज व वै.ह. भ. प. श्री. मामासाहेब दांडेकर यांची पुण्यतिथी संपन्न झाली.
या कार्यक्रमात ह. भ. प. श्री. योगिराज महाराज गोसावी (पैठण), ह. भ. प. श्री. अशोक महाराज विखणकर (श्री द्वारकाधीश संस्थान), ह.भ.प.श्री. श्रीराम महाराज ( श्रीराम मंदिर जळगावकर), दि. 21 जुलै, गुरुपौर्णिमेस गोपाळपूर येथे गोपाळकाल्याचे भजन व मठात सत्यनारायण पुजन व महाप्रसाद होवून श्री संत नामदेव पायरी जवळ देह जाओ अथवा राहो l पांडुरंगी दृढ भावो l पंढरीच्या राया प्रभू दीनानाथा आज्ञा द्यावी येतो आम्ही l हा अभंग होऊन पांडुरंगाचा भावपूर्ण वातावरणात साश्रु नयनांनी निरोप घेवून श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे जळगांवी पायी प्रस्थान झाली पालखी दरकोस मुक्काम 4 जिल्ह्यातून प्रवास करीत श्रावण शुद्ध दशमी 15 ऑगस्ट दिनी संध्याकाळी जळगावि पोहोचेल महाराष्ट्रातील सर्वात उशीरा पोहचणारी पालखी आहे.