जळगांव – जळगांव शहरातील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवी पेठ गणेश मंडळ पुरस्कृत युवा गर्जना ढोल ताशा पथकाचा वाद्य पूजन सोहळा दि.२४ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत सायंकाळी संपन्न झाला.येत्या श्रीगणेशउत्सवा साठी पथकाच्या सरावाला या कार्यक्रमातून प्रारंभ करण्यात आला.
सायंकाळी नवी पेठ गणेश मंडळाच्या चौकात विशेष सजावट करण्यात आलेल्या व्यासपिठावर ढोल ताशा या वाद्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन युवा गर्जना पथकाचे प्रमुख श्री मधुर व सौ.अनुश्री झवर या नवविवाहित दाम्पत्याच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी श्री गणेश पूजनाने वाद्य पूजन सोहळ्याचा प्रारंभ झाला.गणपती बाप्पाला पेढ्याचा नैवैद्य दाखवून आरती करण्यात आली.त्यांनतर शोभेच्या फटाके प्रदर्शनाने उपस्थितांचे चित्त वेधले.
उत्कृष्ट संयोजक कृष्णा सोनवणे यांचा सत्कार
या प्रसंगी युवा गर्जना ढोल ताशा पथकाला ढोल ताशावादनचे विशेष प्रशिक्षण देवून पथकाला सक्षम करणारे मंडळाचे उत्साही कार्यकर्ते कृष्णा सोनवणे यांच्या विशेष योगदानासाठी त्यांचा सत्कार शाल श्रीफळ देवून करण्यात आला.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी नवी पेठ गणेश मंडळ प्रेरणास्थान मनीष झवर,कैलाश मुंदडा,गिरीश झवर, विनीत जोशी,सुनील बारी,मनीष वाणी,भूषण मुंदडा,संदीप जोशी,विनोद मुंदडा,श्रीरंग जोशी, यांचेसह इतर पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवा गर्जना ढोल ताशा पथक सर्व पदाधिकारी,युवा युवती सदस्य, परिसरातील रहिवासी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अमोल जोशी यांनी मंत्रमुग्ध करणारे सूत्र संचालन करून कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.