चाळीसगाव – दि.२३ चाळीसगाव करांना गेल्या दशका पासून असलेली प्रतिक्षा संपली असून येथील तालुक्यातील सर्व नागरिकांना सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली नव्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आल्याने शासकीय कामाचा अनुभव सुखद अनुभूती देणारा ठरणार आहे..
चाळीसगावचे कर्तुत्ववान व धडाकेबाज लोकप्रतिनिधी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून व संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण समारंभ दि.२८जुले रविवारी दुपारी ४ वाजता रेल्वे पुलाजवळ मान्यवर अतिथी यांच्या उपस्थितीत संपन्न होणारआहे.
संपूर्ण मतदार संघात विकासाचा विडा उचलून सातत्याने संपर्क ठेवत गतिशील व लोकोपयोगी सेवा कार्य करण्यावर भर देवून आ.चव्हाण हे राजकीय वाटचाल साधत आहेत.त्यामुळे सामान्य जनता त्यांच्या अश्या कार्याचे कौतुक करत आहे.
चाळीसगाव तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक सुवर्णक्षण असलेल्या या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरीक बंधू भगिनी यांनी बहुसंख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे..