जळगांव – सोमवार दि. २२ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहरातील सौ. सु. ग. देवकर विद्यालयातील जवळपास ५०० शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
शिबिराचे आयोजन वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष विक्की राजपूत यांनी केले. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी शिबिराचे मार्गदर्शक केले. तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, माजी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ.वृषाली पाटील, मोहित पाटील, मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे, संजय पाटील, किशोर सोनवणे, योगेश वंजारी, फैजान पटेल आदींची याप्रसंगी उपस्थिती होती.