विश्व सिंधी सेवा संगम मुंबई अध्यक्ष डॉ.श्री राजू मनवाणी यांची विशेष उपस्थिती
जळगांव – दि.२१ रोजी शहरातील सिंधी समाजाच्या सेवेसाठी अग्रेसर असलेल्या जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायतीच्या माध्यमातून झुलेलाल हॉल येथे समाजातील होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचाली साठी प्रोत्साहित करण्यात आले.
समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून विश्व सिंधी सेवा संगम या प्रसिद्ध संस्थेचे अध्यक्ष, डॉ.श्री.राजू मनवाणी ,कार्यक्रमाचे अध्यक्षपदी समाजाचे खंबीर नेतृत्व मा.राज्य मंत्री(दर्जा) श्री.गुरुमुख जगवाणी,मुखी सीतलदास जवाहरानी,सचिव कमलेश वासवानी.राजेश जवहरानी,हेमंत रुंगठा,यांचेसह इतर पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा प्रारंभ गायक श्री अजय बजाज यांच्या सिंधी भजन कार्यक्रमाने झाला..प्रमुख अतिथी डॉ.श्री राजू मनवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्यात आला.तसेच जळगाव शहर पूज्य सिंधी पंचायतीचे सामाजिक कार्याची माहिती या प्रसंगी करून देण्यात आली.त्या नंतर प्रमुख अतिथी यांचा समाज व पंचायती तर्फे सत्कार पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
सिंधी समाजातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार या प्रसंगी विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते या प्रसंगी करण्यात आला. व अश्याच प्रकारे होतकरू विद्यार्थ्यांनी मागे न वळता आपली परिश्रम
पूर्वक वाटचाल करून शैक्षणिक व इतर क्षेत्रात प्रगती साधून आपल्या समाजाचे नाव मोठे करावे अशी भावना प्रमुख अतिथी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
विशाल जवाहरानी सन्मानित
विशाल विनोद जवाहरानी या नवोदित उदयोन्मुख हॉकी खेळाडू याचा विशेष सत्कार याप्रसंगी समाजाच्या वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याची सप्टेंबर २०२४ च्या रशियातील बी.आर.आय.एस.हॉकी टुर्नामेंट व चीन येथील २०२५ मध्ये होणाऱ्या एशियन विंटर गेम्स साठी भारतीय आईस हॉकी संघात निवड झाल्या निमित्त हा सन्मान करण्यात आला.क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत समाजाचे नाव उंचवले या साठी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
जळगांव शहर पूज्य पंचायती तर्फे आयोजित या गुणवंत सत्कार सोहळा यशस्वी करण्या करीता सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी,समाज बांधवांनी परिश्रम घेतले.समाज बांधवांची या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.