जळगांव – शहरातील शंभरीकडे वाटचाल साधत असलेल्या जागृत स्थान श्रीगुरुदत्त भक्तीप्रसाद धाम येथे दि.२१ रोजी श्रीगुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी अ.भा.औषध विक्रेता संघटनेचे कार्य.सदस्य तसेच जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष केमिस्टभूषण श्री सुनिल भंगाळे यांच्या शुभ हस्ते श्रीदत्त महाराजांची महाआरती करण्यात आली.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानाच्या वतीने करण्यात आले होते.या प्रसंगी श्रीदत्तभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते. सायंकाळी ७ वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सकाळी महाअभिषेक व पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी महाआरतीनंतर श्रीदत्त भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आला.शहरातील विविध भागातून आलेल्या भाविक भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.