जळगाव – येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी विनीत विजय जोशी यांची तर प्रशासन सचिव म्हणून भद्रेश शाह आणि प्रकल्प सचिव म्हणून तुषार तोतला यांची निवड करण्यात आली आहे.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे रविवार दि. २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता क्लबच्या ३२ व्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनंत पांढरे व सहप्रांतपाल उमंग मेहता यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
रोटरी वर्ष २०२४-२५ करिता रोटरी जळगाव वेस्टचे अध्यक्ष विनीत जोशी यांनी नूतन कार्यकारणीची निवड केली असून त्यात आयपीपी सरिता खाचणे, उपाध्यक्ष योगेश राका, प्रेसिडेंट इलेक्ट गौरव सफळे, कोषाध्यक्ष सी.ए. स्मिता बाफना, सहकोषाध्यक्ष अमित चांदीवाल, सार्जंट उमेश महाजन, सहसचिव म्हणून देवेश कोठारी व महेश सोनी यांचा समावेश आहे.
क्लब कमिटी डायरेक्टर म्हणून योगेश भोळे, मुनिरा तरवारी, विनोद बियाणी, नितीन रेदासनी, सुनील सुखवानी, डॉ. राजेश पाटील, डॉ. सुशीलकुमार राणे यांची निवड करण्यात आली आहे.
संचालक म्हणून अरुण नंदर्षी, रमण जाजू ,संदीप काबरा, गनी मेमन, चंद्रकांत सतरा, अनिल कांकरिया, किरण राणे, अनंत भोळे, ॲड. सुरज जहांगीर, संगीता पाटील, कृष्णकुमार वाणी, निखिल बियाणी, विवेक काबरा, डॉ. आनंद दशपुत्रे, डॉ. केतकी पाटील, अतुल कोगटा, सचिन वर्मा, निलेश अग्रवाल व प्रवीण जाधव यांचा समावेश आहे.