जळगांव – शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी, कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागीरदार प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी किडनी माझी काळजी”या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन दि.२१/०७/२४ रविवार रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
व्याख्याते सुप्रसिद्ध किडणी विकार तज्ञ.सुधीर कुलकर्णी,संभाजी नगर हे उपस्थितांना किडनी विकारा संदर्भात कशी काळजी घ्यावी,तसेच किडनी विकार होवू नये या साठी काय उपाययोजना करावी या बाबत सविस्तर मार्गदर्शन व्याख्यानातून करणार आहेत.
हा कार्यक्रम रोटरी भवन,मयादेवी नगर, महाबळ रोड जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व आरोग्यप्रेमी नागरिकांनी या आरोग्य विषयक जागृती वाढवणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व इतरांनाही सहभागी करून घ्यावे असे आवाहन आयोजन करणाऱ्या संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.व्याख्यानाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.