विठ्ठल रखुमाई यांच्या महापुजेसह
करण्यात आली काकडा आरती
नाचणखेडे – जळगांव जिल्ह्यातील जुने व जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक प्राप्त अश्या ३०० वर्षापूर्वीच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दि.१७ रोजी आषाढी एकादशी निमित्त महापुजे सह काकडा आरती करण्यात आली.
गावातील जवळपास 300 वर्षा पूर्वी पासूनचे हे मंदिर आहे येथील विठ्ठल मंदिर तसेच पिंपळगाव हरेश्र्वर तसेच धावडा शिवणा कळमसरे ता पाचोरा व अन्वातल भोकरदन येथील विठ्ठल मंदिरे हे जवळपास एकाच कारागिराच्या टीम ने बांधलेले आहे त्या मुळे सर्व मंदिराची एकच ठेवणं व एकसारखे बांधलेले आहे येथील गावातील सर्व गुरुबंधू हे श्री अन्वेकर दादा महाराजांचे अनुयायी होते त्या मुळे त्यांनी सर्व मंदिरे एकसारखी बांधली होती अन्वेकर परिवारातील असल्याने प्रत्येक गावात वार्षिक भागवत सप्ताह तसेच प्रत्येक गावात त्या काळी बैलगाडी किंव्हा पायी प्रवास करत असत पण वार्षिक भेट व दौरा हमखास राहत होता मग एका एका गावात दोन चार दिवस मुक्काम तसेच नामजप कीर्तन भजन अखंड हरिनाम सप्ताह असे कार्यक्रम होत होते .मग प्रत्येक गावातील दानशूर व्यक्ती देवस्थान ला वर्गणी देत होते काहींनी तर जमिनी घर दान दिली आहेत .संस्थानाला त्या काळी 40 एकर जमीन व काही राहत्या जागा दान म्हणून मिळालेल्या आहेत व त्या आजही टिकून आहेत मग त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानचा वार्षिक खर्च भागविला जातो. गावात वर्षात दोन अखंड हरिनाम सप्ताह असतात देवाचा वाढदिवस कीर्तन भजन तसेच काकडा आरती हे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात
या विठ्ठल मंदिराला 300 वर्षाची परंपरा आहे आणि विशेष म्हणजे सर्व डॉक्युमेंट आजही उपलब्ध आहेत कारण सर्व लिखापडी कुलकर्णी परिवाराच्या घरात म्हणजे आज्या पंज्या पासून वडील काका सर्वांना माहीत होते तेव्हा लोक निरक्षर असल्याने कुलकर्णी परिवार त्या काळी शिक्षित होता त्या मुळे लीखाई पढाई व हिशेब कुलकर्णी परिवारा कडेच होता.आजही ही परंपरा कुलकर्णी परिवार कर्तव्य ब सेवा भावनेने चालवत आहे.