-
ओम हेरंब मंदिरा तर्फे राबवण्यात आला उपक्रम..
जळगांव – शहरातील बळीराम पेठेतील ओम हेरंब गणपती देवस्थानाच्या वतीने आज दि.१७ रोजी आषाढी एकादशीचे निमित्ताने परिसरातील २१ भाविक महिलांना तुळशी रोपांचे कुंडी सह वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून भक्ती भाव वाढीस जाण्याच्या भावनेतून घरोघरी तुळशी रोपे लावून आतोग्यांसंवर्धन करा असा सामाजिक संदेश या संकलपनेतून देण्यात आला.तुळशीचे आरोग्याबाबत जे महत्व पूर्ण स्थान आहे ते महत्व नव्या पिढीत टिकावे असा दृष्टिकोन या उपक्रमात ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला
या प्रसंगी ओम हेरंब गणपती मंदिराचे पदाधिकारी व कार्यकर्ते बिपिन पवार, राहुल घोरपडे, आदित्य बागरे,अनिरुद्ध गवळी,मनीष कलरानी ,अभिनव बागरे मानस महाजन आदींची उपस्थिती होती.
आषाढी एकादशी निमित्त बळीराम पेठेत भाविकांना तुळशी रोपांचे वाटप
अधिक वाचलेल्या बातम्या